स्कूल बस-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत युवक ठार

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धामणगावजवळ स्कूल बस व दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात भूषण प्रकाश भोई (वय-१७, रा़ देऊळवाडे ता़ जळगाव) या दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, या अपघात दुचाकीवर मागे बसलेला आबा घमा सोनवणे (वय-३०, रा़ देऊळवाडे ता़ जळगाव) हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़ दोघेही गावाबाहेर असलेल्या शेतात जात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले़

भूषण भोई हा आसोदा गावाच्या काही अंतरावर असलेल्या देऊळवाडे येथे आई-वडील तसेच बहिणीसोबत वास्तव्यास होता़ तर तो शेती काम काम करायचा़ घराजवळचं मित्र आबा घमा सोनवणे हा राहतो़ तर गावाच्याबाहेर आबा याचे शेत आहे़ त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी भूषण आणि आबा दोघेही दुचाकीने शेतात जाण्यासाठी निघाले़ भूषण हा दुचाकी चालवित होता़ मात्र, धामणगावाजवळून जात असताना दुचाकीचा आणि धामणगावकडून जळगावकडे येणाºया स्कूल बसचा समोरासमोर अपघात झाला़ यात दुचाकीचालक भूषण याच्या छातीला तसेच हाता-पायाल गंभीर ईजा होवून तो जागीच ठार झाला़ तर दुचाकीच्या मागे बसलेला आबा याच्या हाता-पायाल गंभीर दुखापत होवून जखमी झाला़

बसमध्ये होते विद्यार्थी
अपघात झाल्यानंतर स्कूल बस देखील रस्त्याच्या कडेला जावून थांबली़ बसमध्ये तीस ते चाळीस विद्यार्थी होते़ सुदैवाने मोठा अपघात झाला नाही़ अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती़ मात्र, दोन्ही वाहनांच्या अपघातात भूषण याची ज्योत मालवली़

कुटूंबीयांनी घेतली रूग्णालयात धाव
भूषण आणि आबा दोघेही घटनास्थळी पडून असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी त्वरित वाहनातून त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविले़ वैद्यकीय अधिकाºयांनी भूषण यास तपासणीअंती मृत घोषित केले तर गंभीर जखमी आबा याच्या वैद्यकीय अधिकाºयांकडून तात्काळ प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते़ घटनेची माहिती कुटूंबीयांना कळताच त्यांनी देखील रूग्णालयात धाव घेतली़

कुटूंबीयांचा आक्रोश
भूषण याच्या कुटूंबीयांसह त्याच्या मित्र मंडळींची देखील रूग्णालयात गर्दी झाली होती़ मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांनी रूग्णालयात हंबरडा फोडला़ भूषण याच्या पश्चात आई-वडील व बहिण असा परिवार आहे़ तर आबा हा सुध्दा शेती काम करून घराचा उदरनिर्वाह करतो़

Protected Content