लवकरच शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा

मुंबई प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येणार असून सरकार लवकरच ही खुशखबर देण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी कधीपासूनच पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी केली आहे. अलीकडेच राजपत्रीत अधिकार्‍यांच्या महासंघाने ही मागणी लाऊन धरली आहे. यातच आता निवडणूक तोंडावर आली असतांना राज्य शासनाने या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे संकेत दिले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत याबाबत निर्णय होणार असून १ जानेवारी २०२० पासून पाच दिवसांचा आठवडा लागू होणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यासोबत राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीसाठीचे वय हे ५८ वरून ६० करण्याच्या मागणीवरही सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content