नुसते पॅकेज जाहीर करून चाणार नाही, शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्या : राहुल गांधी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे. या काळात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी, मजुर, कष्टकरी हा अर्थकारणाचा पाया आहे. त्यांना सरकारने मदत करायलाच हवी. नुसते पॅकेज जाहीर करून चाणार नाही तर त्यांच्या खिशात पैसे जायला हवेत, अशी मागणी कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

 

राहुल गांधी यांनी आज लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल. लोकांच्या खिशात पैसा नसेल तर लोकं काय खाणार? असा सवाल करत शेतकरी, मजुरांना खिशात पैसे द्यावेत अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. लॉकडाऊन समजुतीने, त्यंत काळजी घेऊन उठवावा लागेल, दक्षतेने उठवायला हवा, हा कोणता इव्हेंट नसावा, वृद्ध, व्याधीग्रस्तांची खबरदारी घेऊन लॉकडाऊन उठवावा.लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल, त्यांना कर्ज देणारे पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवा, लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

Protected Content