रावेर येथे मतमोजणीची जय्यत तयारी

Voting 1

रावेर प्रतिनिधी । रावेर विधानसभा निवडणुक मतदार संघातील मतमोजणीची जय्यत तयारी झाली असून तहसील कार्यालय सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले यांनी नुकतेच सांगितले.

रावेर तहसीलच्या प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत वॉटरप्रूफ मंडप टाकून मतमोजणीची तयार करण्यात आली आहे. उद्या दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. १४ टेबलवरून मतमोजणी होईल. टपाली मतांसाठी २ टेबल, सर्विस मतांसाठी १ टेबल ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या २३ फेऱ्या होतील. निरीक्षक रूची मोहन रॉयल आणि २० सुक्ष्म निरीक्षक मतमोजणीची पाहणी करतील. यावेळी प्रत्येक उमेदवारांचा प्रत्येक टेबलवर प्रतिनिधी नेमणूक आहे. याचबरोबर मीडिया कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी ५ व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठयांची मतमोजणी करण्यात येईल. सहकार्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे, जितेंद्र कुंवर, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, संजय तायडे, सी.जी. पवार, महेश सांळुखे हे उपस्थितीत असतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले यांनी दिली आहे.

Protected Content