जळगाव बसस्थानकात दोन महिलांनी पळवले महिलेचे मंगळसूत्र

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञात दोन महिलांना गळ्यातील मंगळसुत्र तोडून नेल्याचा प्रकार आज 11 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रतिभा रविंद्र पाटील (वय-35) रा. शिवकॉलनी हे आपले पती, भाऊ व वहिनीसोबत अमळनेर येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले. त्यांना अमळनेर येथे जाण्यासाठी सकाळी 11 वाजता जळगाव अमळनेर बसआल्याने बसच्या दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्यांच्या मागे दोन अज्ञात महिला उभ्या असतांना त्यांच्या गळ्यातील 6 हजार रूपये किंमतीच 3 ग्रॅमचे दोन मंगळसुत्र आणि चार हजार रूपये किंमतीचे 2 ग्रॅमचे मनी असे एकुण 10 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार प्रतिभा पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीसांकडे धाव घेतली. याप्रकरणी दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content