तलवार हल्ला प्रकरणातील तिघांना मध्यरात्री अटक; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून एकाला चौघांनी मारहाण करून डोक्यात तलवारने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती. याप्रकरणातील एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ३० मार्च रोजी कंजरवाडा येथे अक्षय नेतलेकर हा चोरून दारू विक्री करीत होता. त्यामुळे दारू खरेदीसाठी काही नागरिक त्याच्याजवळ आले असता, त्याचवेळी सचिन सुरेंद्र अभंगे (२७, रा. कंजरावाडा) हा तरूण त्याठिकाणी आला व त्याने येथे दारू मिळत नाही, तुम्ही येथून निघून जात असे सांगितले. याचा राग आल्याने असे बोलल्याचे वाईट वाटून अक्षय नेतलेकर याने विजय नेतलेकर, पिंटू नेतलेकर, सुरज नेतलेकर (सर्व रा. कंजरवाडा) यांना बोलवून चौघांनी सचिन यास शिवीगाळ करीत मारहाण केली़ नंतर सुरत नेतलेकर याने तलवार आणून ती सचिन याच्या डोक्यात मारली़ त्यात तो गंभीर जखमी झाला़ अखेर याप्रकरणी ३१ माच रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिन अभंगे यांच्या फिर्यादीवरून हल्ला करणाऱ्‍या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच घटना घडल्यापासून चौघे संशयित फरार झाले होते.

मध्यरात्री केली अटक
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पो.कॉ. हेमंत काळसकर व चंद्रकांत पाटील यांना तलवार हल्ला प्रकरणातील संशयित हे सिंगापूर- कंजरवाडा येथे असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता कंजरवाडा येथून तिघांना अटक केली आहे. पूढील तपास पोउनि विशाल वाठोरे हे करीत आहेत.

Protected Content