यावल येथे वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन ट्रॅक्टर जप्त

 

यावल ,  प्रतिनिधी   । येथील महसुलच्या पथकाने  गौण खनिजची बेकायद्याशीर  व अवैध वाहतुक करीत असतांना दोन  ट्रॅक्टर वाहनांवर तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये करवाई करून दोघी वाहन जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार बुधवार  दि. ५ एप्रिल रोजी भालशिव पिंप्री घाटशिवारातुन दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अवैद्यरित्या विनापरवाना गौण खनिज वाळूची  वाहतुक करतांना गणेश महाजन यांचे ट्रॅक्टर क्रमांक ( एम एच ४३ एल११oo)  आणि एजाज देशमुख यावल यांच्या मालकीचे (ट्रॅक्टर क्र. एमएच १९ पी१७१९ ) हे दोघे वाहन महसूल पथकाने जप्त केली. ही दोघी  वाहन यावल नगर परिषदच्या शेजारी महसुलच्या मंडळ अधिकारी शेखर तडवी भाग यावल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक ईश्वर कोळी तलाठी यावल, विरावली तलाठी मारोडे, यावल कोतवाल निलेश गायकवाड यांच्या पथकाने गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर सापळा रचुन विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना पकडण्यात आले आहे.  दोघ ही ट्रॅक्टर वाहन ही दंडात्मक कारवाई कण्यात आले आहे. तहसीलदार महेश पवार यांनी नियुक्त केलेल्या वाळू माफीया विरूद्धच्या भरारी पथकाव्दारे होत असलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफीयावर चांगलेच वचक निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे.

Protected Content