बुधवारी दिवसभरात ४ लाख १२ हजार ६१८ कोरोना रुग्णसंख्येची नोंद

 

  नवी दिल्ली : वृत्तसंस्था । बुधवारी देशात  ४ लाख १२ हजार ६१८ जणांना कोरोनाची लागण झाली  यापूर्वी ३० एप्रिलला देशात  बाधा ४ लाख २ हजार ३५१ जणांना झाली होती. बुधवारी   ३ हजार ९८० जणांचा   मृत्यू झाला  ३ लाख २९ हजार ११३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 

आतापर्यंत देशात २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २३ हजार १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९ जणांचं लसीकरण केलं असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य खात्यानं दिली आहे.

 

 

देशातील १२ राज्यात १ लाखांहून अधिक, ७ राज्यात ५० हजाराहून अधिक आणि १५ राज्यात ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण आहेत. २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १५ टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. देशात प्रत्येक दिवशी २.४ टक्के वेगाने रुग्ण वाढत आहेत.

 

रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्याचबरोबर अपुऱ्या वैद्यकीय यंत्रणांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

Protected Content