Home आरोग्य रावेरात शहरात तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद

रावेरात शहरात तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद

0
88

रावेर प्रतिनिधी । रावेर शहरासह परीसरात कोरोनाचा वाढत्या पादुर्भावामुळे लावलेल्या तिन दिवसाच्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरीकांचा प्रतिसाद मिळत असून विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती.

जळगाव जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस निर्बंध लावण्यात आले आहे. जनता फर्क्यूमुळे रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, गांधी चौक, चावळी भाग पंचशील नगर आदी ठिकाणी रस्ते सामसुम होते. तर विनामास्क बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत होते. स्टेशन रोड, स्वातिक टॉकीज, उटखेडा रोडवर पोलिसांकडून वाहनांची कसुन तपासणी केली जात होती. सोबत रावेर परीसरातील केऱ्हाळा रसलपुर, वाघोड, वाघोदा, खानापुर आदी गावांमध्ये देखिल लोकडाऊन चांगला प्रतिसाद मिळत होता.

 


Protected Content

Play sound