पाणी पातळी वाढवण्यासाठी मेगा रिचार्ज प्रकल्प गरजेचा – आमदार हरिभाऊ जावळे

raver baithak news

फैजपूर प्रतिनिधी । दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत असल्याने यावर उपाय योजना गेल्या काही वर्षात आम्ही केल्या पण पाण्याची पातळी खऱ्या अर्थाने वाढविण्यासाठी मेगा रिचार्ज प्रकल्प हा शेवटचा आणि यशस्वी पर्याय असल्याचे मत आमदार हरीभाऊ जावळे यांनी केले.

भारतात पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतभर जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात यावल आणि रावेर तालुक्याची सुद्धा निवड झालेली आहे. सदर विषया संदर्भात आमदार हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहाय्यक सहसचिव राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत बैठक पडली.

आलेल्या या परिस्थितीवर काय उपाय योजना करता येऊ शकतात त्या संदर्भात आमदार हरिभाऊ जावळे यांनी सबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. केंद्राकडे या मेगा रिचार्ज संधर्भात आग्रही भूमिका आपल्या अहवालात नमूद कराव्यात असे मतही आमदार जावळे यांनी व्यक्त केले. सदर बैठकीत पाणी पातळी वाढवण्यासाठी काय करता येऊ शकते या संदर्भात चर्चा झाली. तात्पुरत्या स्वरूपाची उपाय योजना म्हणून यावल रावेर तालुक्यात सर्व संत महंत याच्या आशीर्वादाने एक थेंब अमृताचा हे जलसंधारणाचे अभियान राबावत १५ नद्या आणि ३ नाल्या मध्ये करण्यात आलेल्या कामाची माहिती सदर अधिकार्याना या बैठकीत देण्यात आली.

याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, प्रभारी उप विभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, नियोजन समिती सदस्य हिरालाल चौधरी, डॉं. आर.एम. चौधरी, यावल गट विकास अधिकारी किशोर सपकाळे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा अधिकारी जैन, सहाय्यक अभियंता जलसंधारण राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content