बक्षीस वितरणाने पीपीएल क्रिकेट टुर्नामेंटचा उत्साहात समारोप

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । प्रेसिडेंट प्रिमीयर लिग बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट २०२० चे आयोजन गोदावरी इंग्लिश मीडियम ललीश स्कूल जळगाव आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ़ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. या टुर्नामेंटचा आज बक्षीस वितरणाने समारोप करण्यात आला.

सदर स्पर्धा २१, २२ फेब्रुवारीला घेण्यात आल्यात. यात १२ संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत गोदावरी अ‍ॅग्री कॅम्पस म्हणजेच अ‍ॅग्री बॉस ११ आणि अ‍ॅग्रोनियर ११ हे दोन संघ संयुक्त विजेते ठरले. तर जीआयएमआर रॉयल्स हा संघ उपविजेता ठरला आणि पिंक पंडाज भुसावळ ह्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेत बेस्ट बॅटर म्हणून अ‍ॅग्री बॉस – ११ मधील वैशाली पुसदेकर, प्लेयर ऑफ द सिरीज फिमेलमध्ये पिंक पंडाजमधील मनिषा बर्‍हाटे ह्या तर पुरुष गटात बेस्ट बॉलरसाठी जीईएमएस र्स्टासचे आसिफ खान, बेस्ट बॅटर अ‍ॅग्रोनियर ११ चे गणेश चौधरी, प्लेयर ऑफ द सिरीजमध्ये जीआयएमआर रॉयल्सचे चंद्रकांत डोंगरे यांची वर्णी लागली.

पीपीएल क्रिकेट टुर्नामेंटच्या बक्षीस वितरणाप्रसंगी गोदावरी आजी, संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील,  डॉ. केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.एस.एम. पाटील, डॉ ए पी चौधरी, डॉ एस एस राठी, डॉ प्रशांत वारके, प्राचार्या नीलिमा चौधरी आदी उपस्थित होते. बक्षिस वितरणा नंतर प्रेसिडेंशियल ११ या संघा सोबत स्पर्धेचा विजयी संघ अ‍ॅग्री कॅम्पस यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पाटील यांनी केले.

 

Protected Content