ऐतिहासीक कसोटीत भारताचा विजय

कोलकाता वृत्तसंस्था । येथील ईडन गार्डन मैदानावरील डे-नाईट कसोटीत भारताने बांगलादेशचा एक डाव आणि ४६ धावांनी दारूण पराभव करत या सामन्यासह मालिकाही जिंकली आहे.

पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपवला. दुसर्‍या डावात उमेश यादवने बांगलादेशचे पाच गडी बाद केले. तर त्याला इशांत शर्माने ४ बळी घेत चांगली साथ दिली. बांगलादेशचा एक फलंदाज जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही. मुश्फिकुर रहिमने मैदानात थोडावेळ तग धरत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज झटपट माघारी परतले आणि भारताने सहजपणे विजय संपादन केला. या विजयासह भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग चार सामने डावाने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २७ वं शतक पूर्ण केलं. कर्णधार म्हणून हे त्याचं २० वं शतक आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतकं ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराट आता दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ (२५) आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग (१९) आहेत.

Protected Content