“सद्गुरू स्मृती महोत्सव” अंतर्गत विविध स्पर्धा

abc

 

फैजपूर प्रतिनिधी । येथील स्वामिनारायण गुरुकुल संस्थेने “सदगुरू स्मृती महोत्सव” अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेची सुरूवात दिपप्रज्वलाने करण्यात आली. यावल-रावेर तालुक्यातील शाळा, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मधील सुमारे ७५० विदयार्थ्यांनी संस्कार सिंचन व निबंध स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प.पु.स.गु.शा. भक्तिप्रकाशदास यांनी आशिर्वचनात सांगितले की, मुलांना जन्मादाती आई स्तनपानातून संस्कार देत असते, ते केवळ शारिरीक पोषण नसते. संस्काराद्वारे नवनिर्मिती साधने जोडणारी व नाते जोडणारी कृती होत असते. संस्कारातून व्यक्तीगत प्रगती साध्य होऊन, त्याला समाज मान्यताही मिळते. लहान वयापासून घेतलेले संस्कार मनुष्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत उपयोगी होत असतात, असे आपल्या आशिर्वचनात सांगितले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.व.पु.होले व प्रा.आर.आर.राजपूत हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे ट्रस्टी पी.डी.पाटील, प्राचार्य संजय वाघुळदे आणि सर्व गुरुकुल शिक्षक-शिक्षकेत्‍तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेंचे परिक्षक
संस्कार सिंचन स्पर्धेचे तोंडी बाहय परीक्षक म्हणून- प्रदिप बेंडाळे (न्हावी), वासुदेव चौधरी(न्हावी), ललित बोरोले(न्हावी), जे.के.वाघुळदे (फैजपूर), सुधाकर चौधरी(फैजपूर), नंदकिशोर पाटील(सावदा), संजय भोई(सावदा), प्रा.डॉ.मिनाक्षी वाघुळदे(फैजपूर), मिनाक्षी बेंडाळे(न्हावी), दिपांजली चौधरी(न्हावी), सीमा चौधरी(सावदा) यांनी काम पाहिले. समारंभाचे संचालन व आभार शिक्षक निलेश बोरोले यांनी केले.

Protected Content