‘त्या’ चार मुख्याध्यापकांना कोर्टाचा दिलासा; वेतन सुरू होणार

अमळनेर ईश्‍वर महाजन । जिल्ह्यातील चार मुख्याध्यापकांचे वेतन अदा न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र या मुख्याध्यापकांना न्यायालयात दिलासा मिळाला असून त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यातील चार माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक यांनी अतिरिक्त शिक्षक हजर न केल्याने वेतन अधीक्षक माध्यमिक जि प जळगांव यांनी माहे डिसेंबर २०१८ पासून वेतन अदा करू नये असे पत्र जिल्हा बँक येथे दिले होते. याबाबत मुख्याध्यापकांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक ६३१/२०१९ दाखल केली होती. यासदर रीट याचिकेनुसार चारही मुख्याध्यापक यांचे वेतन सुरू करणेबाबत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा परिषद जळगाव यांनी पत्र काढले. यामुळे आता श्रीमती जयश्री सोनवणे( डी आर कन्या शाळा अमळनेर), किशोर सोनवणे (ग.स
हायस्कूल अमळनेर), गजानन कुलकर्णी( सरस्वती विद्यालय यावल) व अरुण घोलप( माध्यमिक विद्यालय मंगरुळ तालुका पारोळा) यांच्या रखडलेल्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Add Comment

Protected Content