राजस्थानचा मुंबईवर ८ गडी राखून दणदणीत विजय

अबूधाबी वृत्तसंस्था । बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने मुंबईवर ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे आव्हान कायम राहिले असले तरी चेन्नईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाची राजस्थानविरुद्ध सामन्यात खराब सुरुवात झाली. क्विंटन डी-कॉक जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसर्‍या विकेटसाठी ८३ भागांची भागीदारी केली. कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर इशान किशन विकेट गमावली. त्याने ३७ धावा केल्या. यानंतर मुंबई इंडियन्सचे फलंदाज चमक दाखवू शकले नाहीत. शेवटी सौरभ तिवारी आणि हार्दिक पांड्याने धावसंख्येला वेग आणला. पांड्या बंधूंनी कार्तिक त्यागीच्या अखेरच्या षटकात फटकेबाजी करत मुंबईला १९५ आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली.

मुंबईने दिलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवातही निराशाजनक झाली. जेम्स पॅटिन्सनने रॉबिन उथप्पा (१३) आणि स्टीव्ह स्मिथ (११) या दोघांना बाद केले. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने यांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. स्टोक्सने ६० चेंडूत १४ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारासह नाबाद १०७ धावा केल्या. तर संजून सॅमसनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा करत स्टोक्सला उत्तम साथ दिली.

Protected Content