यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच सैय्यद असद अहमद जावेद अली यांची युवक कॉंग्रेस पक्षाच्या रावेर यावल युवक कॉंग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मारूळ तालुका यावल येथील लोकनियुक्त सरपंच व कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्त यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कॉंग्रेस पक्षासाठी केलेली तळमळ तसेच पक्षाच्या वाढीसाठी व प्रचार प्रसार साठी आज पर्यंत केलेले योगदान पाहून कॉंग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश नाना पटोले यांनी दखल घेत त्यांची रावेर यावल युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्षपदी निवड केली आहे.
सैय्यद असद अहमद यांच्या निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले आहे. या निवडीचे युवक कॉंग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत,महाराष्ट्र प्रभारी उदय भानु,सह प्रभारी एहसान खान,उत्तर महाराष्ट्र प्रभारी राहुल माणीक,जिल्हा प्रभारी आंनद पुरोहीत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आ. शिरीष चौधरी,माजी आ.रमेश चौधरी, पंचायत समिती चे माजी गटनेते शेखर पाटील,कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल शहराध्यक्ष कदीर खान , अनु.जाती विभागाचे अनिल जंजाळे यांच्यासह युवक कॉंग्रेस यांनी व रावेर यावल विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचे स्वागत करण्यात येत आहे.