दूरध्वनीच्या खांबाला धडक दिल्याने खांब कोसळून ट्रॅक्टर उलटले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा नदीपात्रातून वाळू घेऊन शनिपेठकडे येणाऱ्या ट्रॅक्टरने दूरध्वनीच्या खांबाला धडक दिल्याने खांब कोसळून ट्रॅक्टरही उलटले. यामुळे ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर व कडेला असलेल्या गटारीत पसरली होती. काही वेळाने डंपर मागवून त्यात ही वाळू भरुन नेण्यात आली. ही घटना सोमवारी १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता चौगुले प्लॉट भागात घडली.

वाळू उपसा बंद असला तरी वाळूची वाहतूक सुरूच असल्याची नेहमी ओरड होत असते. त्यात चौगुले प्लॉट भागातून दररोज वाळूचे ट्रॅक्टर ये-जा करत असतात. विदगाव येथून तापी नदीपात्रासह खेडी, आव्हाणे येथून गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून ही वाहने ममुराबादकडून येणाऱ्या रस्त्यावरून चौगुले प्लॉट भागातून जळगाव शहराकडे येत असतात, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता लाल रंगाचे एक ट्रॅक्टर ममुराबाद रस्त्याकडून येत असताना चौगुले प्लॉट कॉर्नरवर मोतीलाल भावलाल चौधरी यांच्या घराजवळ असलेल्या एका दूरध्वनीच्या खांबाला धडकले. त्यामुळे हा खांब कोसळला व ट्रॅक्टरही उलटले. त्यामुळे त्यातील वाळू रस्त्यावर व गटारीत पसरली. काही वेळाने डंपर मागवून त्यात वाळू भरून नेण्यात आली.

Protected Content