तांबापूरा परिसरात बेकायदेशीर गावठी दारूची विक्री करणाऱ्या तरूणाला अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंजरवाडा परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तरूणाला आज एमआयडीसी पोलीसांनी अटक करून त्याच्या ताब्यातील १ हजार ८०० रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंजरवाडा परिसरात संशयित आरोपी मयूर उर्फ काल्या देविदास बागडे (वय-२९) रा. तांबापूरा कंजरवाडा हा घराच्या बाजूला बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली व पोलीसांना कारवाईच्या सुचना दिल्यात. एमआयडीसी पोलीसांनी आज दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक मिलिंद सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल विजय बाविस्कर, पो.कॉ. सुधीर साळवे, होमगार्ड दिपक बाविस्कर, अजय चौधरी या पथकाने कारवाई करत संशयित आरोपी मयूर बागडे याला अटक केली असून त्याच्या ताब्यातील १ हजार ८०० रूपये किंमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पो.कॉ. सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मयुर बागडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content