अयोध्या प्रभु रामचंद्र मंदिर निर्माण निधीसाठी शेंदूर्णीत बैठक

शेंदूर्णी प्रतिनिधी । अयोध्या नरेश प्रभु रामचंद्र मंदिर निर्माण निधीसंदर्भात शेंदूर्णीतील प्रमुख भागातील निधी संकलन समिती सदस्यांच्या बैठकांचे येथील पारस मंगल कार्यालयात रविवारी आयोजन करण्यात आले होते.

या सभेसाठी शेंदूर्णी नगरपंचायत उपनगराध्यक्षा चंदा अग्रवाल, रंजना धुमाळ, भक्ती कुलकर्णी व निधी संकलन समितीचे प्रमुख माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल, नारायण गुजर, भाजपचे प्रकाश झंवर, मनसेचे डॉ. विजयानंद कुलकर्णी, आरएसएसचे अनिल पाटील, प्रदीप गुजर, हे मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीराम प्रतिमा पूजन करण्यात आले. निधी संकलनासाठी सर्व कॉलण्यातील महिला पुरुषांसह तरुण तरुणींच्या सर्वसमावेशक विविध समित्यांच्या रचना तयार करण्यात आल्या व त्यांच्या प्रमुखांच्या नेमणुका करण्यात आल्या. सर्वांच्या सहभागातून जास्तीत जास्त निधी जमा करण्याचा संकल्प  करण्यात आला. प्रास्ताविक प्रदीप गुजर यांनी केले प्रमुख मार्गदर्शक अनिल पाटील यांनी नियोजनानुसार सर्वांनी काम केल्यास  जास्तीत जास्त निधी जमा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर समितीचे प्रमुख गोविंदजी अग्रवाल यांनी प्रत्येकाच्या सक्रीयतेचे महत्व सांगून जास्तीत जास्त निधी जमा करण्याचा संकल्प सर्वांकडून करवून घेतला बैठकीत शहरातील कॉलण्यातील तरुण तरुणींसह नागरिक बंधुभगिनी बैठकीत उपस्थित होते.

 

 

Protected Content