यावल महाविद्यालयात शेअर मार्केट विषयी उपप्राचार्य संजय पाटील यांचे मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे तिसरे पुष्प सी.के.पाटील यांनी गुंफले. अध्यक्षस्थान उपप्राचार्य संजय पाटील सर यांनी भूषविले. सदर कार्यक्रम प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.

सी. के. पाटील सर यांनी भारतीय अर्थव्यवस्था व शेअर मार्केट या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शेअर मार्केट विषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अज्ञान व गैरसमज आहे. या क्षेत्रात अभ्यास करून विचारपूर्वक गुंतवणूक करावी. त्यातून आर्थिक लाभ होणार. यात निश्चितच फक्त कौशल्य व संयम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अध्यक्षीय विचार मांडताना संजय पाटील यांनी प्रतिपादन केले की, पैसा साठवण्यापेक्षा तो चलनात आणा. शेअर मार्केटमुळे  भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावून देशाचा फायदा होईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज पाटील सर तर आभार प्रवीण पाटील सर यांनी मांडले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. एस. पी. कापडे व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.

 

Protected Content