अनुभवी नेत्याची उणीव भासल्याने आठवण आली असावी – आ. खडसे (व्हिडीओ)

eknath khadse

जळगाव, प्रतिनिधी | “विधान भवनात आज (दि.१) काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माझ्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकिर्दीचे कौतुक केले, आज कदाचित अनुभवी नेत्याची उणीव भासत असावी, म्हणून या दोघा नेत्यांना माझी आठवण आली असावी,” असे मत आज विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

 

ते यावेळी पुढे म्हणाले की, “विरोधी पक्षनेत्याचे पद हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल असते. जनतेचे प्रश्न प्रखरतेने लावून धरणे, त्यासाठी कुठलीही तडजोड न करणे, सरकारला जाब विचारून जनतेची कामे करून घेणे, ही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असते. मला असलेल्या विधानसभेच्या प्रदीर्घ अनुभवामुळे मी ती जबाबदारी चांगली पार शकलो होतो.”

देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत, त्यांच्याकडे सत्ताबदल करणारा नेता म्हणून बघितले जाते, कदाचित त्यांच्याकडूनही माझ्यासारख्याच कामगिरीची अपेक्षा असावी, म्हणून माझी आठवण निघाली आवी, असेही आ. खडसे यांनी यावेळी म्हटले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/757576588059901/

 

Protected Content