समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा : फडणवीस

Fadnavis

 

मुंबई (वृत्तसंस्था) मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा, असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा दावा केला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ४० टक्के मिळालेले तिघे १२० टक्क्यांनी मेरिटमध्ये आले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी नव्या सरकारच्या आघाडीची आकडेमोड केली. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो. उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध. काही कारणानं ते दुरावले. पण, तरीही मी मुख्यमंत्र्यांना आश्वासन देतो की, कधीही आवाज द्या. आम्ही नेहमीच सहकार्य करू. जनहिताच्या निर्णयासाठी आम्ही सोबत असू, पण, सरकार जर जनतेच्या आकांक्षाची पूर्तता करत नसेल तर आसूड ओढायला मागे पुढे पाहणार नाही

Protected Content