मुंबईत खार येथील इमारत कोसळली

 

khar

 

मुंबई प्रतिनिधी । येथील खार रोड क्रमांक 17 मधील पूजा अपार्टमेंट (पाच मजली) इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. याठिकाणी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, खार रोड क्रमांक 17 येथील पूजा अपार्टमेंट इमारत अचानकपणे आज दुपारी १.१५ मिनिटांच्या सुमारास कोसळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पायऱ्यांचा भाग कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये, यासाठी रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्याचे काम सध्या सुरु आहे. काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content