Home Cities धरणगाव धरणगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस साजरा

धरणगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस साजरा

0
57

dharangav nss

धरणगाव, प्रतिनिधी | येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘स्थापना दिवस’ दत्तक ग्राम पष्टाने येथे साजरा करण्यात आला. या दिवसांतर्गत पष्टाने गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. मतदान जनजागृतीसाठी आणि स्वच्छतेच्या महत्वासाठी प्रभात फेरीचे आयोजनही करण्यात आले होते.

 

यावेळी विद्यार्थ्यांना मतदानासंदर्भात आणि स्वच्छतेसंदर्भात तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ पदार्थांचे सेवन न करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्ष म्हणून इतिहास विभागप्रमुख प्राध्यापक संजय शिंगणे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पष्टाने येथील सरपंच किशोर निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. दीपक बोंडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. जोशी, प्राध्यापक गौरव महाजन, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ज्योती महाजन तसेच विभागातील सर्व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound