काँग्रेस कमेटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी सैय्यद मोहम्मद इखलास

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील मारूळ येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सैय्यद मोहम्मद इखलास सैय्यद ईरशाद अली यांची काँग्रेस कमेटीच्या जळगाव जिल्हा अंतर्गत येणाऱ्या काँग्रेस कमेटीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या यावल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रा निमित्ताने सावदा येथे पक्षाचे नेते व माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद वाहेद शेख यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थित माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते निवड पत्र देवुन नियुक्ती करण्यात आली आहे.

सैय्यद मोहम्मद इखलास यांच्या निवडीचे काँग्रेस कमेटीचे यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील , युवा नेतृत्व धनंजय चौधरी,मारूळ चे सरपंच सैय्यदअसद जावेद अली, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड,यावलचे माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी, यावल माजी नगरसेवक मनोहर सोनवणे,काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे ,कौग्रेस यावल शहराध्यक्ष कदीर खान,काँग्रेसच्या आदीवासी विभागाचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी,उमेश जावळे,प्रदेश सरचिटणीस जलील पटेल यांच्यासह आदी पक्षातीत पदाधिकारी यांनी स्वागत केले .

Protected Content