यावल महाविद्यालयात ‘अवयव दान’ विषयावर मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे दुसरे पुष्प दिलीप मोरे यांनी गुंफले. त्यांनी अवयव दान जीवन दान या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ.एस.पी. कापडे यांनी भूषविले. सदर कार्यक्रम प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

दिलीप मोरे यांनी अवयव दान जीवन दान या विषयावर प्रतिपादन केले की, अवयवदान ही काळाची गरज आहे. सर्व दानांमध्ये अवयदान हे श्रेष्ठदान आहे. तुमच्या अवयदानातुन गरजू व गंभीर रुग्णांना जीवनदान  देता येते. अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. पी .कापडे यांनी मत व्यक्त केले की, समाजात अवयवदानाची चळवळ उभारून जागृती होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले तर आभार अरुण सोनवणे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. एम .डी खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, संजय पाटील, प्रा. एस. आर. गायकवाड यांनी सहकार्य केले. या उपक्रमात सर्व शिक्षक उपस्थित होते.

Protected Content