चाकूचा धाक दाखवत एकाला बेदम मारहाण

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनगर एका प्रौढाला तीन जणांनी चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली तर त्यांच्या खिश्यातील १ हजार रूपये काढून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील लक्ष्मी नगर येथे राहणारे राजेंद्रसिंग बाबुसिंग चीतोडिया (वय-५२) रा. बसस्टॉपच्या पाठीमागे लक्ष्मीनगर हे त्यांच्या घरासमोर उभे असताना निखिल सुनील अजबे, ऋषिकेश दीपक पाटील आणि आशिष सुनील इरकल सर्व रा. चाळीसगाव हे आरडाओरड करू लागले. त्यावेळी राजेंद्र चितोडिया यांनी आरडाओरडा का करताय ?  असे सांगितल्यावर तिघांना राग आल्याने राजेंद्र चितोडिया यांची कॉलर पकडली तर आशिष इरकल याने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील एक हजार रुपयांची रोकड काढून घेऊन त्यांना बेदम मारहाण केले. तसेच ‘तू जर आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुला चाकूने ठार करेल’ अशी धमकी दिली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहे.

Protected Content