Home Cities पाचोरा पाचोरा अग्रलक्ष्मी बहुमंडळातर्फे आरास स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण

पाचोरा अग्रलक्ष्मी बहुमंडळातर्फे आरास स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण

0
35

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील अग्रवाल समाजाच्या अग्रलक्ष्मी बहुमंडळाने अग्रवाल समाजासाठी घरगुती गणपती आरास स्पर्धचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना घरी जावून बक्षिस देण्यात आले.

आपल्या घरातील गणणतीच्या आरास मधुन काहीतरी समाजोंपयोगी संदेश मिळेल, आजच्या धर्तीवर देखावा, कोरोना महामारी, सुंदर सुवीचार इत्यादी विषयावर आधारीत सजावट स्पधैचे विनामुल्य आयोजन करन्यात आले होते. यामध्ये समाजातील बहु मंडळातील सर्व पारिवारांनी  सहभाग नोंदवुन सर्वांनी ज्वलंत देखावा, सुंदर आरास व समाजोपयोगी अर्थबोध होईल अशी आरास करीत आयोजकांची मने जिंकली. मंडळाच्या अध्यक्षा टिना अग्रवाल, उपाध्यक्षा मोनिका पटवारी, सचिव श्रेया मोर, उर्वशी मोर, चांदनी पटवारी, यांनी सहभागी स्पर्धकांच्या घरी जाऊन निरीक्षकाची भुमिका बजावली.

घरोघरी जाऊन जवळपास समाजातील ४० घरांमध्ये  जाऊन निरीक्षण करीत विजेत्या स्पर्धकांची निवड करीत त्यांना पारीतोषीक प्रदान केले. यात विजेत्या स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक अदीती मोर, द्वीतीय – मेघा मोर, तृतीय – कविता मोर, उत्तेजनार्थ म्हणुन साधना मोर, संगिता अग्रवाल, रेषु पटवारी आदींनी सर्वोत्कृष्ट देखावे तयार केले होते. अग्रलक्ष्मी बहुमंडळतर्फे सर्व विजेत्यांना गौरविण्यात येवून स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व अग्रलक्ष्मी मंडळाच्या पदाधीकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound