नायगावात महिलांना साड्या वाटप

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथे आदिवासी समाजातील विधवा व निराधार महिलांना साड्या वाटपाचे कार्यक्रम  संपन्न झाले .

या समाज बांधवांच्या वतीने सामाजीक बांधील की म्हणुन समाजहिताच्या दृष्टीने विचार करून तळागळातील आपल्या बांधवांना शैक्षणिक आर्थिक दृष्टया सक्षम करणे, तरूणांना रोजगार उपल्बध करणे, यासाठी आदिवासी ग्रामविकास मंडळाची सस्थापना करण्यात आली. यासाठी आवश्यक असणारे कार्यालयासाठी दिलदार कासम तडवी यांनी विनामुल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी नासेर तडवी हे होते तर  प्रमुख पाहुणे म्हणुन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्तरिय समितीचे अध्यक्ष डॉ चंद्रकांत बारेला यांच्यासह समिती सदस्य तथा आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष , अनिल तडवी (उपकार्यकारी अभियंता  सार्वजनिक बांधकाम विभाग यावल ), नौशाद तडवी(माजी नगराध्यक्ष यावल ), नजमा तडवी(नगराध्यक्ष मुक्ताईनगर ), मिनाताई तडवी (समाजसेविका), शरिफा तडवी(सरपंच नायगाव), जफरूल्लाह जमादार (सदस्य एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्प यावल ), यासीन तडवी ( स्वछता निरीक्षक ठाणे महानगरपालिका ), इरफान तडवी मुक्ताईनगर, मुबारक तडवी, उपस्थित होते.

या संपुर्ण कार्यक्रमास मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर तडवी आणि जाहबीर तडवी यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमची प्रस्थावना  मेहेरबान तडवी यांनी मांडली. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संस्थेचे निवड झालेल्या कार्यकारी मंडळ लुकमान  तडवी, संस्थापक अध्यक्ष फकिरा तडवी, समिर तडवी, महेंद्र सोळुंके, मेहरबान रहिमान तडवी, रहिमान तडवी, तुकडू  तडवी, कलिंदर तडवी, कुर्बान  तडवी, कलिंदर  तडवी, सिराज तडवी, वजीर तडवी, सुपडू  तडवी, नथू तडवी, सलीम सायबू तडवी, रुबाब बाबू तडवी, मेहरबान तडवी, राजू तडवी, रफीक  तडवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Protected Content