आपत्ती विमोचन समितीतर्फे रक्तदान शिबीर

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपत्ती विमोचन समिती तर्फे येथील श्रीराम मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ५१ जणांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचे हस्ते प्रभू श्रीरामचंद्र व भारत माता प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी भुसावळचे नूतन उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, डॉ. उमेश चौधरी, घ. का. विद्यालय आमोदाचे अध्यक्ष उमेश पाटील. भाजपा शहर अध्यक्ष अनंता नेहेते, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, डॉ. प्रा. आर आर. राजपूत, निलेश राणे, डॉ जयवंत पाटील, जागृती लोहार, सागर खर्चाने उपस्थित होते.

याप्रसंगी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र जळगाव यांनी रक्त संकलित केले. तर अनिरुद्ध सरोदे, सुरज गाजरे, दीपक पाटील, हर्षल महाजन, युवराज किरंगे, श्याम चौधरी, रितेश चौधरी, नीरज झोपे, मोहित पाठक, ललित पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती विमोचन समिती फैजपूर यांनी परिश्रम घेतले

या शिबिरात निळकंठ कोल्हे भूषण वाघुळदे, पुष्पक चौधरी, महेंद्र वायकोळे, गिरीश वायकोळे, सूरज गाजरे, राजेश चौधरी, मोहन पाचपांडे, संकेत बढे, आकाश चौधरी, विजेंद्र सोनार, मोहित पाठक, राहुल भोई, कुणाल सरोदे, कल्पेश बाणाईत, हेमंत पवार, परेश कुरकुरे, युवराज किरंगे, यश जैन, आकाश चौधरी, नवल सरोदे, चेतन कोल्हे, ललित पवार, श्याम चौधरी, नंदकिशोर अग्रवाल, अमित कुलकर्णी, स्वप्नील सैतवाल, हर्षल गाजरे, श्रेयस पाठक, मिलिंद बाक्षे, प्रशांत चौधरी, दिपक पाटील, रोहन फिरके, निळकंठ चौधरी, लोकेश कोल्हे, राहुल बोरोले, वैभव मोरे, हितेंद्र महाजन, राकेश कोल्हे, आनंद अग्निहोत्री, ईश्‍वर चौधरी, महेश वाघुदेकर, यश वाणी, निशांत परदेशी, हिमांशू परदेशी, धीरज नेमाडे, चेतन पाटील, विक्रम झोपे, निरज झोपे, सुशांत पाटील, नदीम तडवी, ज्ञानेश्‍वर चौधरी, हर्षल वायकोळे, नीरज भंगाळे, अमोल ठोंबरे, अनिल चौधरी, योगेश्‍वर कोल्हे, राहुल भोई, दिपक कापडे यांनी रक्तदान केले.

Protected Content