टाकरखेडाकर डॉ. महेश महाजन यांनी वैदयकीय क्षेत्रात घेतली उंच भरारी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तालुक्यातील टाकरखेडा या छोट्याशा गावातील मुळचे रहिवाशी असलेले डॉ.महेश सुनील महाजन हे एम.सि.एच.न्यूरो सर्जरी  या सुपर स्पेशालिटी परीक्षेत विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले आहेत. डॉ.महेश यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय, भुसावळ येथून तर एम.बी.बी.एस. नायर वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या नामांकीत वैद्यकीय महाविद्यालयातुन पुर्ण केलेले आहे.

एम.एस. जेन सर्जरी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविदयालय अंबेजोगाई येथून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेले असुन डॉ. महेश महाजन हे नीटी सुपर स्पेशालिटी परीक्षेत भारतातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या कुटुंब, समाज, गाव-तालुक्यासह जिल्हाचे नाव तेव्हा रोषण केले होते

मौलाना आझाद मेडिकल कॉलेज आणि जी.बी.पंत हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे एमएचसीएच एम.सि.एच. न्यूरो सर्जरी  या सुपर स्पेशालिटी कोर्स साठी प्रवेश मिळविला होता. नुकताच एम सिएच एम.सि.एच.न्यूरो सर्जरी सुपर स्पेशालिटीचा निकाल लागला असुन डॉ. महेश हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत.

डॉ.महेश हे त्यांच्या राणे राजपूत समाजातील पहिलेच न्यूरो सर्जरी असल्याने. स्व समाजा सह सर्व स्तरातुन त्यांचे खूप खूप कौतुक होत आहे. डॉ. महेश महाजन यांचा शैक्षणिक प्रवास हा विदयार्थ्यांना प्रेरणादायी असा आहे. डॉ. महेश हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भुसावळ येथे कार्यरत असलेले सुनील रतन महाजन  सुपुत्र आहे.

Protected Content