रनिंग, सायकलिंग, स्विमिंग व योगाभ्यासाद्वारे नवीन वर्षाची सुरुवात !

भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एक जानेवारी हा  इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस. त्यानिमित्ताने प्रत्येक व्यक्ती संपूर्ण वर्षासाठी काहीतरी नियोजन अथवा संकल्प करीत असतो.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स  असोसिएशन संपूर्ण वर्षभर भुसावळ शहरातील नागरिकांसोबत रनिंग,  सायकलिंग, योगाभ्यास करीत असते. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून  सोमवारी एक जानेवारी रोजी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्र येत रनिंग,  स्विमिंग, सायकलिंग व योगाभ्यास करून नवीन वर्षाची सुरुवात आदर्शवत केली व संपूर्ण भुसावळ शहरवासीयांना आरोग्याचा मूलमंत्र दिला.

डाॅ  बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर पहाटे 5.45  वाजता सर्वप्रथम सर्व धावपटूंनी  एकत्र येऊन वॉर्म अप एक्सरसाइज करायला सुरुवात केली. त्यानंतर शहरातील आरपीडी रोडवर चारुलता अजय पाटील, ममता ठाकूर,सुनिता सोमदत्त सिंग,सुनिता रंजन सिंग, मनीषा सिंग, पिंकी सिंग, पुष्पलता चौधरी, प्रीती पांडा, अर्चना दत्तात्रय चौधरी, मुकेश चौधरी, संजय भदाणे, संजिव पाटील, अजय आंबेकर,तरुण बिरिया, सुरेश सहानी, अजय पाटील, राजेंद्र ठाकूर, प्रदीप माळी, राजेंद्र घाटे, संतोष घाडगे, रणजीत खरारे, प्रवीण वारके, प्रवीण पाटील या धावपटूंनी  5 किमी ते 10 किमी अंतर धावून सर्व धावपटू पुन्हा क्रीडांगणावर परतले.

त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली. त्याशिवाय 2024 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ताराचंद खरारे,मंगेश चंदन, गणसिंग पाटील या तीन धावपटूंनी एकत्रितरित्या चक्क 24 किमी धावून नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले. त्याचबरोबर विजय फिरके यांनी अतिशय थंड वातावरण असून देखील तापी नदीच्या पात्रात 700 मीटर स्विमिंग करून संपूर्ण भुसावळ शहरवासीयांसाठी आरोग्याचा मूलमंत्र दिला.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाजवळ असलेले भाजी विक्रेते व कामानिमित्त रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार, चारचाकीस्वार व तमाम नागरिक यांनी टाळ्या वाजवून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या या धावपटूंच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले व या अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत  केल्याबद्दल अभिनंदन केले.

Protected Content