“त्या” भीषण अपघातातील दोघांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव जवळील वाघूरपुलावर भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वारासह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवार ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. या अपघातप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात बसवरील अज्ञात चालकाविरोधात मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ जवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाघुर नदीच्या पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या बस क्रमांक (एमएच २० बीएल २७३९) ने भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ एएम ६८७)ला जोरदार धडक दिली होती. या धडकेत दुचाकीस्वार कुतुबुद्दीन शेख अजीमुद्दीन व त्यांची आई बदरूनिसा शेख कुतुबुद्दीन दोन्ही रा. मास्टर कॉलनी,जळगाव या दोघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना रविवार ५ नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. या अपघात प्रकरणी वसीम शेख कुतुबुद्दीन शेख (वय-३७) रा.मास्टर कॉलनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात बसवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

Protected Content