विद्यापीठातील व्याख्यानमालेत डॉ. कांचन नारखेडे यांचे मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आहे ती परिस्थिती स्वीकारून आपल्या मार्गावर सरळपणे चालत गेलो तर मनावर कोणत्याही प्रकारचे ताण येत नाहीत असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बाबु जगजीवनराम मुलींच्या वसतिगृहात सहकार महर्षि कै. प्रल्हादराव पाटील व्याख्यानमालेचे आयोजन मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी डॉ. नारखेडे बोलत होत्या. व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. पवित्रा पाटील अध्यक्षस्थानी होत्या तर संत मुक्ताबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष (SMIT) ॲ.ड रवींद्रभैय्या पाटील, अधिसभा सदस्या तथा वसतिगृहाच्या रेक्टर डॉ. कीर्ती कमळजा यांची प्रमुख उपस्थिती होती. वसतिगृहातील मुलींचे शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर डॉ. कांचन नारखेडे यांनी संवाद साधला. विचार, भावना आणि वागणूक हे मनाचे तीन अवयव आहेत. मनात निरूपयोगी विचार जमा होत असतात. ते काढून आहे ती परिस्थिती स्वीकारून सरळ मार्गाचा अवलंब करावा. वेळच्यावेळी सर्व गोष्टी केल्या तर मार्ग निघतो व ताण कमी येतो असे सांगून त्यांनी आपल्या व्याख्यानात मुलींच्या प्रश्नांचा ऊहापोह केला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. पवित्रा पाटील यांनी सोशल मिडीयापासून दूर राहिले तर ताण कमी येईल असे मत व्यक्त केले. ॲ.ड रवींद्रभैय्या पाटील यांनी सहकार महर्षि कै. प्रल्हादराव पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. प्रा. आशुतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले.

Protected Content