भोकर भादली शिवारातून शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोकर भादली येथील भुईकोट काट्याजवळून एका शेतकऱ्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संदीप पितांबर पाटील (वय-४३) रा. भादली खुर्द ता. जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारा ते भोकर भादली शिवारातील भूईकोट काट्याजवळ कामाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांनी आपली दुचाकी तिथेच लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील करीत आहे.

Protected Content