यावल ग्रामीण रूग्णालयात ५० ऑक्सीजन बेड उपलब्ध करा; आ. राजूमामा भोळे यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण संख्येत वाढत असतांना यावल ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन सुविधा अपुर्ण पडत आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात ५० ऑक्सीजन बेड उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आज गुरूवारी पत्र देवून केली आहे.

आमदार भोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने जास्त प्रमाणात वाढत असून पुढील दिवसात वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येला वैद्यकीय उपचार मिळण्यास खूपच दिरंगाई होत आहे. जिल्ह्यातील यावल तालुका येथे कोविड रुग्णांची संख्या वाढत असून तेथे ऑक्सिजन सुविधा पुरेश्या  प्रमाणात नसल्याने तेथील नागरिकांना उपचार घेण्यास त्रास होत असून त्यांची उपचार घेण्यासाठी इतर शहरांमध्ये धावपळ होत आहे. यावल येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देणे बाबत किंवा अन्य शासकीय जागेत ५० बेडचे ऑक्सिजन सुविधे सह कोविड सेंटर त्वरित सुरु करावे अशी मागणी यावल तालुक्यातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केलेली होती. निवेदनाचा पाठपुरावा करून आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हाशल्य चिकित्सक यांना आज गुरूवारी मागणीचे पत्र देवून लवकरात लवकर यावल येथे ५० बेडचे ऑक्सिजन सुविधा असलेले कोविड सेंटर सुरु करण्याबाबत विनंती केलेली आहे.

 

Protected Content