आंतर विद्यापीठ क्रिडा स्पर्धेसाठी विद्यापीठा संघ रवाना

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कुरूक्षेत्र विद्यापीठ येथे होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ रवाना झाला.

 

२० ते २७ एप्रिल दरम्यान कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र येथे अखिल भारतीय क्रिडा स्पर्धा होणार आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय विद्यापीठ, शिखर (राजस्थान) येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. त्यामुळे हा संघ अखिल भारतीय क्रिडा स्पर्धेसाठी पात्र ठरला. या संघामध्ये तुषार चोरडिया, संकेत पांडे, तनिष जैन, पियुष सोहाने, सौरभ सिंग, रिषभ कारवा (मु. जे महाविद्यालय, जळगाव), सिध्देश देशमुख (के. सी. ई. आयएमआर, जळगाव), नचिकेत ठाकूर (जी. एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), शुभम शर्मा (सदगुरू शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव), अमय कोळी (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), तुलजेश पाटील (म. तू. पाटील महाविद्यालय, मारवड), ऋग्वेद बाविस्कर (धनदाई महाविद्यालय, अमळनेर), अरविंद थापा ( रावल महाविद्यालय, दोंडायचा), तन्मय शहा (जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार), प्रतिक शिंदे ( एसएसव्हीपीएस महाविद्यालय, धुळे), रोहन भोळे (सरदार वल्लबभाई पटेल महाविद्यालय, ऐनपूर) यांचा समावेश आहे. डॉ. सचिन झोपे प्रशिक्षक आहेत. अशी माहिती क्रिडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी दिली.

Protected Content