शिक्षक कल्पेश पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | समाजाची निस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय आणी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.

यंदा सन २०२१-२२ या वर्षासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आदिवासी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे मुळचे देवगाव ता. चोपडा येथील रहीवाशी व जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कुसुंबे ता.रावेर येथील उपशिक्षक कल्पेश राजेंद्र पाटील यांना जाहीर झाला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे दि.३ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात शिक्षक कल्पेश पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कल्पेश राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या शाळेमध्ये राबवलेले विविध उपक्रम तसेच शाळेच्या प्रगतीसाठी आणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी झोकून देऊन केलेले कार्य याची दखल शासनाच्या वतीने घेण्यात आल्याने त्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. देवगाव ता.चोपडा येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आहे. कल्पेश पाटील हे उंटावद विविध कार्येकारी सोसायटीचे सचिव संजय महाजन यांचे जावाई आहे. जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे श्रेय पाटील यांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच कुसुंबे ग्रामस्थ यांना दिले असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.

Protected Content