Home धर्म-समाज शिरसाड येथे मुक्ताई दिंडीचे स्वागत; महाप्रसादाचे आयोजन

शिरसाड येथे मुक्ताई दिंडीचे स्वागत; महाप्रसादाचे आयोजन

0
132


yawal1 2

यावल प्रतिनिधी । किनगाव ते मुक्ताई दिंडीस आज तालुक्यातील किनगाव येथून प्रारंभ झाला. दरम्यान तालुक्यातील शिरसाट येथे दिंडीतील भाविकांसाठी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, यावेळी हभप धनंजय एकनाथ पाटील, हभप आर.ई. पाटील यांच्याहस्ते मागील १७ वर्षांपासून दिंडीची सेवा होत आहे. या दिंडीमध्ये यावल पोलिस स्टेशन पो.नि. अरूण धनवडे यांनी उपस्थिती लावून गांवकरी व दिंडीतील नागरिकांना व भाविकांना धार्मीक व सामाजीक विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी साहेबांनी शिरसाड येथील कै.कमलाबाई एकनाथराव पाटील सार्वजनिक वाचनालयाला भेट देऊन वाचनालयाच्या उत्कृष्ट कार्य पाहुन स्तुती केली. वाचनालयातर्फे यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस पाटील यांनी पुस्तके भेट देऊन सत्कार केला. यावेळी गावकरी व नागरिकांनी पोलिस अधिकारी आपल्या गावात येवुन दिंडीत सहभाग घेतल्याने शिरसाडच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला व त्यांचे स्वागत केले.


Protected Content

Play sound