शेंदूर्णी गरुड महाविद्यालयास न्याकतर्फे बी प्लस दर्जा

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला नुकत्याच संपन्न झालेल्या न्याक पुनःमूल्यांकन तिसरी साखळी करिता विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीची बंगलोर येथील राष्ट्रीय स्तरावरील स्वायत्त संस्था न्याकच्या वतीने न्याक पीअर टीमच्या माध्यमातून झालेल्या मूल्यांकनातून बी प्लस दर्जा प्रदान केला आहे.

गरुड महाविद्यालय हे न्याकच्या मूल्यांकन आणि मनांकनाकरिता कोरोना पूर्व काळ आणि कोरोना काळात प्रयत्नशील होते, न्याकच्या जानेवारी, २०१८ पासून लागू झालेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार जे पूर्णपणे विद्यार्थी केंद्रित तसेच आयसीटि केंद्रित आहे ज्यामध्ये ७०% म्हणजे ७०० गुणांचे मूल्यांकन आणि गुणांकन हे ऑनलाईन पद्धतीने तर  ३०% म्हणजे३०० गुणांचे मूल्यांकन हे प्रत्यक्ष पीअर टिमच्या भेटीतून होते तर या भेटीकरिता न्याक बंगलोरच्या वतीने समिती अध्यक्ष म्हणून शिवामोगा, कर्नाटकायेथील कोवेम्पू विद्यापीठाचे माजी प्रभारी  कुलगुरू डॉ टि आर मंजुनाथ, सदस्य समन्वयक म्हणून काश्मीर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ एम ए खुरू तर सदस्य म्हणून जालंधर पंजाब येथील पीसीएम महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ किरण अरोडा ह्या होत्या, या दोन दिवसीय भेटीदरम्यान समितीने महाविद्यालय, अनुषंगिक सेवा सुविधा, व्यवस्थापन मंडळ, माजी विद्यार्थी संघ, पालक, आजी विद्यार्थी, विद्यार्थी शिक्षक यांचे विविध क्षेत्रातील यश त्यांची कामगिरी, महाविद्यालय विभागनिहाय कामगिरी, आयक्यूएसी ची गुणवत्तापूर्ण कामगिरी इत्यादिंचे अवलोकन करण्यात आले.

यासर्व कामगिरीच्या आधारावर महाविद्यालयास बी प्लस दर्जा देऊन मनांकित करण्यात आले, यापूर्वी महाविद्यालयास २००४ साली झालेल्या मूल्यांकणात सी प्लस प्लस, २०१४ साली झालेल्या पुनर्मूल्यांकनात बी आणि आता या मूल्यांकणात सुधारणा करत बी प्लस मानांकन प्राप्त करत आपल्या गुणांकन वाढविण्यात महाविद्यालय यशस्वी ठरले आहे, उपलब्ध आकडेवारीनुसार ९५% महाविद्यालय हे गुणांकनात खाली  घसरत असतांना महाविद्यालयाने संपादित केलेले यश हे महत्वपूर्ण मानले जात आहे याकरिता धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन दादासाहेब संजयराव गरुड, सचिव सतीशजी काशिद, सहसचिव दिपक गरुड, संचलिका उज्वलाताई काशिद, संचालक सागरमलजी जैन,  यु यु पाटील, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, सर्व संस्था पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वासुदेव रमेश पाटील यांचे वेळोवेळी अनमोल असे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आणि या यशाबद्दल महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी या सर्वांचे संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले.

Protected Content