नवी दिल्ली । मध्यप्रदेश प्रमाणे राजस्थानातही काँग्रेसमध्ये बंडाळीचे संकेत मिळाले असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या समर्थक आमदारांसह दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष नवीन नाही. हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत असतात. काही महिन्यांपूर्वी भाजपने चतुर खेळी करून मध्यप्रदेशातील नाराज नेते ज्योतिरादित्य सिंदीया यांना गळाला लाऊन सत्तांतर केले होते. याची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होते की काय ? अशी स्थिती आता उदभवली आहे. शनिवारी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांना घेऊन दिल्लीला गेले. या आमदारांना हरयाणातील गुरुग्रामध्ये एका रिसॉर्टवर ठेवण्यात आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वर्चस्वावरून धुसफूस सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अविश्वास असल्याचं बोललं जात असून, त्यामुळे सचिन पायलट हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये तरूणांऐवजी वृध्द नेत्यांनी संधी मिळत असल्याने ही नाराजी उफाळून आल्याचे समजते. सिंदीया यांनी याच प्रकारे बंडाचा झेंडा हातात घेऊन भाजप गाठले. आता ते राज्यसभेत दाखल झाले असून त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर सचिन पायलट हे देखील याच प्रकार काँग्रेसला धक्का देणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news