हिवरा नदीपात्रात बुडून दोन बालकांचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील हिवरा नदीच्या पात्रात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला असून या दोघांचे मृतदेह आढळून आले असून याबाबत पाचोरा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील शासकीय आयटीआयजवळ असणार्‍या हिवरा नदीपात्रात दोन बालके आंघोळ करण्यासाठी गेली होती. नुराणी नगर भागातील जुनेद अनिस बागवान (वय १३) व सईद अफजल पिंजारी (वय १३) ही दोन्ही मुले हिवरा नदीकाठावर आंघोळ करत असताना पाय घसरून डोहात पडल्याने ते नदीत वाहून गेले. ते दोघे या वर्षी सातवी पास होऊन आठवीच्या वर्गात जाणार होते. सायंकाळी डोहाबाहेर कपडे आढळून आल्याने या घटनेचा उगलडा झाला. यानंतर दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह धाव घेतली. यातील जुनेद बागवान याचा मृतदेह दगडाच्या कप्प्यात अडकलेला आढळून आला. तर सईद पिंजारी याचा मृतदेह रात्री उशीरा आढळून आला. दोन्ही बालकांच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले असून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

या घटने संदर्भात पाचोरा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पाचोरा शहरातल्या नुराणी नगर भागावर या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content