चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पाटील पदाची आवश्यकता असताना तालुक्यातील ३२ गावात पोलिस पाटील हे पद रिक्त असल्याचे उघडकीस आले असून आ.मंगेश चव्हाण यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्राद्वारे हे पद तातडीने भरण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील नवीन महसूल दर्जा प्राप्त गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून अद्यापपर्यंत पोलिस पाटील हे पद रिक्त आहे. हे पद तातडीने भरण्यात यावे यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. नवीन महसूल दर्जा प्राप्त गाव पुढीलप्रमाणे – चैतन्य तांडा क्र.४, ईच्छापूर तांडा क्र. १, ईच्छापूर तांडा क्र २, ईच्छापूर तांडा क्र ३, हरीनगर, कृष्णापुरी, विष्णूनगर, चंदीकावाडी, सुंदर नगर, ३२ नंबर तांडा, वाधारी तांडा, शामवाडी, दिपनगर, सेवानगर, गुजरदरी, नाईकनगर, विसापूर, परशुराम नगर, साईनगर, कृष्णानगर, गोरखपूर, कोंनानगर, सोनगाव, तुकाराम वाडी, शिंदवाडी, चज्त्रभुज तांडा, रोकडे, ढोमणे, शेवरी, कृषीवाडी, खराडी व चिंचगव्हान आदी गावांचा त्यात समावेश आहे.