उद्या काँग्रेसचा सत्याग्रह दिवस

जळगाव प्रतिनिधी । सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी अर्थात दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी किसान अधिकार दिवस असून याला सत्याग्रह दिवस म्हणून पाळला जाणार आहे.                    

३१ ऑक्टोबर या दिवशी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसेच स्व . इंदिरा गांधी पुण्यतिथी ‘ हुतात्मा दिन ‘ या दिवशीच किसान अधिकार दिवस पाळावा . जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाभर  याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वा . या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सत्याग्रह आयोजित करून केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांना विरोध दर्शविला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले कृषी विधेयके मागे घ्यावेत यासाठी हे ३१ ऑक्टोंबर या दिवशी सत्याग्रह करणार असल्याने काँग्रेस चे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी या सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड संदीप सुरेश पाटील यांनी केले आहे.

Protected Content