नायगाव येथील लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे; यावल गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रश्न पुनश्च यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे नायगावच्या असंख्य आदीवासी बांधवांनी व आवास योजनेच्या पात्र असुन अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी याविषयी तक्रार केली आहे.

यावल वेथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना नायगाव येथील आदीवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते विनोद तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.८ फेब्रुवारी मंगळवार रोजी असंख्य आदीवासी बांधवांनी भेट घेवुन नायगाव ग्रामपंचायतीच्या प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात सव्हेंक्षणात केलेले वशीलेबाजीच्या गोंधळामुळे सुमारे २ooच्यावर पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेतुन डावलण्यात आले असल्याची तक्रार केली असून या प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे वरिष्ठ पातळीवर सव्हेंक्षण करण्यात येवुन डावलण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळुन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

या निवेदनावर विनोद तडवी, सरफराज तडवी, मुस्तफा अरमान तडवी, फकिरा टेलर, मुकारक सुपडु तडवी, अजीत तडवी, नथ्थु तडवी, राजु तडवी, ईसा तडवी यांच्या स्वाक्षरी असुन या प्रसंगी गावातील अनेक ग्रामस्थ मोठया संख्येत उस्थितीत होते.

 

Protected Content