Home क्राईम चिंचोली येथील तरूणाची शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या

चिंचोली येथील तरूणाची शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या

0
123


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील २१ वर्षीय तरूणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आला आहे. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

ललीत उर्फ लक्ष्या वासूदेव कोळी (वय-२१) रा. चिंचोली ता. यावल असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललीत कोळी हा आईवडील व भाऊ यांच्यासह चिंचोली ता. यावल येथे वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता गुरांना चारा टाकून येतो असे सांगून घरातून शेतात गेला होतो. त्यानंतर ललीत हा रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोधाशोध केला असता मिळून आला नाही. दरम्यान गावातील मयुर सुभाष कोळी हा मंगळवारी ८ फेब्रुवारी ललीत कोळी यांच्या कासारखेडा शिवारातील शेतात गेले असतां एका लिंबाच्या झाडाला ललीत कोळी याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत यावल पोलीसांना माहिती देण्यात आली, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पयताच्या पश्चात आई मिराबाई, वडील वासूदेव अर्जून कोळी, भाऊ पंकज  आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुले करीत आहे.


Protected Content

Play sound