वसुंधरा फाउंडेशनतर्फे ‘दानपर्व २०१९’ चे आयोजन

14b3bbd9 94f2 47b1 90c7 b730dfd32d6d

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) दरवर्षा प्रमाणे वसुंधरा फाउंडेशनतर्फे ‘दानपर्व’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी नवीन वह्या, पुस्तके, दप्तर, वॉटर बॅग, कंपास, स्टेशनरी, शालेय साहित्य दान करू शकतात. संस्थेच्या सदस्यांकडे या वस्तू जमा केल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना या वस्तूचे वाटप केले जाणार आहे. परिस्थिती नाही म्हणून अनेक विद्यार्थी शिकू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने शिक्षणाचा त्यांचा मार्ग सुकर होणेकरीता मदत होणार आहे. तरी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

 

२०१५ मध्ये वसुंधरा फाउंडेशन चाळीसगावची स्थापना करण्यात आली. वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित व गरीब परिवारासाठी अनेक उपक्रम गावोगावी राबविण्यात येत आहे. जुने व वापरण्यासाठी योग्य कपडय़ाचे संकलन करून त्यांना शहादा नंदुरबार जिल्हातील अदिवासी परिवारा पर्यंत पोहचविण्याचे कार्य दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दान पर्व च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. याकाळात दरवर्षी सुमारे ७०० विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. दिवाळी सर्वांची सर्वांसाठी उपक्रम अंतर्गत गरीब कुटुबांना तसेच विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात येते. दरवर्षी ५०० कुटुबांपर्यंत दिवाळीचा गोडवा पसरविण्यात येतो. २०१८ मध्ये मराठी शाळांमध्ये सुध्दा विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ मिठाई वाटप करण्यात आली होती. तसेच त्यांना भेट वस्तूंचे वितरण करण्यात आले होते. दरमहा काही कष्टकरी महिलांना मोफत किराणा संस्थेच्या माध्यमातून पुरवला जातो. चाळीसगावातील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि शिबिराचे आयोजन आजवर वसुंधरा फाउंडेशनने केले आहे.

धडगाव येथे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, भडगाव येथील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांला आर्थिक मदत, पाणी फाउंडेशन च्या वाटर कप स्पर्धेत सहभागी रांजणगाव व कुंझर ग्रामपंचायती ला श्रमदानाचे साहित्य वाटप, पोलीस सरळ व भरती साठी तयारी करण्यासाठी दोन दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर चे आयोजन तसेच अवयव दान जनजागृती मोहीम अंतर्गत वसुंधरा फाउंडेशन ने उल्लेखनीय कार्य केले आहे. वसुंधरा फाउंडेशन तर्फे बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळेतील ४०० शिक्षक प्रतिनिधींना चांगला स्पर्श वाईट स्पर्श याबाबत प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिक्षक प्रतिनिधींनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चांगला स्पर्श वाईट स्पर्श याविषयी जनजागृती करण्यात आली. संस्थेमार्फत आवश्यक प्रशिक्षण सामग्री सर्व शाळांना पुरविण्यात आली होती. वसुंधरा फाउंडेशन तर्फे २०१९ पासून निस्वार्थ राष्ट्राची समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तींना “वसुंधरा रत्न” पुरस्कार देण्यात येत आहे. सह्याद्रि प्रतिष्ठाणचे संस्थापक श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांना दुर्गसंवर्धन बाबत राबवित असलेल्या चळवळी साठी राज्य स्तरावरील वसुंधरा रत्न २०१९ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

 

अधिक माहितीसाठी सचिन पवार (८३७८९८९६६७), संजय पवार (९४२३५७३७३०),सुनिल भामरे (९०९६९३२९८६), गजानन मोरे (९८९०५३७८३३),देवेन पाटील (७०२०३३३२०८), धर्मराज खैरनार (९८९०६५०६५४) रवी परदेशी (९२२६१२३३३५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर आॅनलाईन आर्थिक स्वरूपात मदत एच.डी.एफ.सी बँक चाळीसगाव चालू खाते क्र 50200016099450 आय एफ एस कोड HDFC0002401 येथे करता येईल.

Add Comment

Protected Content