जुन्या भांडण मिटविण्यावरून दाम्पत्याला मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील चंडीकावाडी येथे जुना वाद मिटविण्याच्या कारणावरून दाम्पत्याला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुदाम मांगू पवार वय ४३ रा. चंडीकावाडी ता. चाळीसगाव हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. जुना वाद मिटविण्याच्या कारणावरून सुदाम पवार व त्यांची पत्नी यांना नकुल प्रकाश पवार, प्रकाश मांगू पवार दोन्ही रा. चंडीकावाडी ता. चाळीसगाव रणजित भावसिंग जाधव, नवनाथ भवसिंग जाधव दोन्ही रा. सांगवी ता.चाळीसगाव यांनी लाकडी काठीने बेदम मारहाा करून दुखापत केली. तर महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र तोडून नुकसान केले आहे. याप्रकरणी सुदाम पवार यांनी मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे नकुल प्रकाश पवार, प्रकाश मांगू पवार दोन्ही रा. चंडीकावाडी ता. चाळीसगाव रणजित भावसिंग जाधव, नवनाथ भवसिंग जाधव दोन्ही रा. सांगवी ता.चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भगवान माळी हे करीत आहे.

Protected Content