जुन्या भांडणावरून दोन जणांना मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खंडाळा गावाजवळील पुलावर जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणासह त्याच्या मावसभावाला ४ जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रितेश राजेंद्र महाजन वय २१ रा. खंडाळा ता. भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे पवन राजू कोळी, सुशील अनिल कोळी, गणेश सुरेश कोळी आणि सुनिल दिपचंद कोळी यांनी शिवीगाळ करत रितेशसह त्याचा मावसभावाला फायटरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना खंडाळा गावाजवळील पुलावर सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रितेश महाजन याने भुसावळ तालुका पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पवन राजू कोळी, सुशील अनिल कोळी, गणेश सुरेश कोळी आणि सुनिल दिपचंद कोळी सर्व रा. खंडाळा ता. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश राठोड हे करीत आहे.

Protected Content