नांदुरा तालुक्यात भाजपचा झंझावात ! : रक्षाताईंच्या प्रचाराला प्रतिसाद

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं आठवले गट आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी नांदुरा तालुक्यातील ठिकठिकाणी मतदारांच्या घरोघरी जाऊन विजयाच्या हॅटट्रीकसाठी साद घातली. याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

रावेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नांदुरा तालुक्यातील मौजे तांदुलवाडी, शेंबा, टाकरखेड, बेलुरा खैरा, महाळुंगी, माळेगांव गोंड ई. गावात प्रचार केला. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांच्या सोबत माजी आमदार चैनसुख संचेती तसेच नांदुरा तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीच्या वतीने नांदुरा तालुक्यातील मौजे तांदुलवाडी, शेंबा, टाकरखेड, बेलुरा खैरा, महाळुंगी, माळेगांव गोंड ई. गावात प्रचारार्थ मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या सर्व गावांमध्ये ठिकठिकाणी खासदार रक्षाताई खडसे यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मतदारांनी त्यांना लागोपाठ तिसर्‍यांना लोकसभेवर निवडून जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content